Friday 16 December 2011

ट्रेनिंग @ पुकार


ट्रेनिंग @ पुकार

पुकार मध्ये वेग-वेगळी वोर्कशोप्स केले जातात. रिसर्च करण्यासाठी लागणारी आवश्यक तयारी केली जाते. रिसर्च म्हणजे काय?.तो कसा करतातकोणत्या पद्धती वापरतात ? याची माहिती दिली जाते. इंटर्विव, मापिंग, फोटो ग्राफी, केस स्टडी, गट चर्चा, कॉम्पुटर ट्रेनिंग, कोडींग, अनालिसिस आणि रिपोर्ट लिहिणे हे सगळे शिकवले जाते. 

आम्ही मापिंग वोर्कशोप्स मध्ये जावून map बनवले होते. एक map खाली बघा. 





फोटो ग्राफी शिकलो.



इंटर्विव शिकलो


कॉम्पुटर आणि इंटरनेट पण शिकलो.


करिअरचा विचार करता का?


आम्ही प्रश्न विचारला, "तुम्ही करिअरचा विचार करता का" ८८ % मुलांनी याला "हो" तर १२% मुलांनी "नाही" असे उत्तर दिले होते.

बहुतेक मुले "पुढे काय" याचा विचार करतात पण त्यांना मार्गदर्शन नाही मिळत, योग्य माहिती पण नाही मिळत. त्यांना काय करावे हा मोठा प्रश्न पडतो, मग संस्थेत असलेले एक सारखे छोटे मोठे कोर्सेस ते करतात आणि कामाला लागून थोडे पैसे कसे मिळतील याचाच विचार करतात.

कमी शिक्षण, छोटी-मोठी नोकरी म्हणून खूप कमी पगार मिळतो, आणि जीवनाचा दर्जा वर येत नाही, तो  तिथेच राहतो. 

संस्था बदली.


संस्था बदली.

काही संस्था मुलांना वयाच्या १८ वर्षापर्यंत ठेवतात तर काही संस्था त्यांच्या नियमानुसार मुलांना त्या आधीच दुसर्या संस्थेत पाठवून देतात.
त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या दैनिक जीवनावर परिणाम होतो. एका होस्टेल मध्ये राहून मुले मित्र, दोस्त, नाती जोडतात. नवीन इ ठिकाणी गेल्यामुळे ये सगळे बदलते. नवीन होस्टेल मध्ये नवीन नियम असतात, ते फोलो करावे लागतात. नवीन ठिकाणी आल्या मुले नवीन संगती मिळतात, नवीन संगती जर वाईट असतील तर त्याचा परिणाम वाईट होतो. व्यसन, चोरी करणे आणि शिक्षण सोडून देणे हे होते.

आमच्या मुलाखती मध्ये, दिसून आले कि, बहुतेक मुले मुंबई मध्ये ३ ते ४ होस्टेल्स बदली करून आली आहेत. त्यांना त्रास सहन करावा लागला. एका मुलाला त्याचे यवतमाळचे शिक्षण अर्धे सोडून मुंबईत यावे लागले. त्याचे वर्षपण वाया गेले. त्याने आम्हाल प्रश्न केला कि, "याला जिम्मेदार कोण"

खरच, "याला जिम्मेदार कोण"

आम्ही रिसर्चर्स आहोत.

आम्ही मुंबई मध्ये चेंबूर आणि कोपर खैरणे येथील होस्टेल्स मध्ये राहतो. 
आम्ही स्वतः इथल्या वेगवेगळ्या अनाथ, निराधार आणि गरजू मुलांच्या होस्टेल मध्ये राहत आहोत. 
त्यांचे जीवन अनुभवले आहे. पुकार च्या मदतीने या विषयावर रिसर्च पण करत आहोत. 




आमच्या ग्रुपमध्ये एकूण ७ जण आहेत. आम्ही सगळे मिळून होस्टेल मध्ये राहणाऱ्या मुलांच्या विषयावर रिसर्च करत आहोत. या ब्लोग मधून आम्हाला मिळालेली माहिती सर्वाना सांगण्याची आमची इच्छा आहे.
हा ब्लोग जरूर वाचा आणि आपली प्रतिक्रिया इथे लिहा.