Friday 16 December 2011

संस्था बदली.


संस्था बदली.

काही संस्था मुलांना वयाच्या १८ वर्षापर्यंत ठेवतात तर काही संस्था त्यांच्या नियमानुसार मुलांना त्या आधीच दुसर्या संस्थेत पाठवून देतात.
त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या दैनिक जीवनावर परिणाम होतो. एका होस्टेल मध्ये राहून मुले मित्र, दोस्त, नाती जोडतात. नवीन इ ठिकाणी गेल्यामुळे ये सगळे बदलते. नवीन होस्टेल मध्ये नवीन नियम असतात, ते फोलो करावे लागतात. नवीन ठिकाणी आल्या मुले नवीन संगती मिळतात, नवीन संगती जर वाईट असतील तर त्याचा परिणाम वाईट होतो. व्यसन, चोरी करणे आणि शिक्षण सोडून देणे हे होते.

आमच्या मुलाखती मध्ये, दिसून आले कि, बहुतेक मुले मुंबई मध्ये ३ ते ४ होस्टेल्स बदली करून आली आहेत. त्यांना त्रास सहन करावा लागला. एका मुलाला त्याचे यवतमाळचे शिक्षण अर्धे सोडून मुंबईत यावे लागले. त्याचे वर्षपण वाया गेले. त्याने आम्हाल प्रश्न केला कि, "याला जिम्मेदार कोण"

खरच, "याला जिम्मेदार कोण"

No comments:

Post a Comment